मुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी) रात्री मास्कधारी हल्लेखोरांना राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली आहे. रक्ताने माखलेले तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 18 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर अभिनेत्री ट्विंकल खन्नाचे ट्वीट सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहे. सध्याच्या परिस्थीवर ट्वीटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


ट्विंकल खन्ना आपल्य ट्वीटमध्ये म्हणाली, 'भारत हा असा देश आहे जिथे विद्यार्थ्यांपेक्षा गाईला जास्त संरक्षण मिळते. मात्र आता हा देश झुकण्यासाठी तयार नाही. तुम्ही हिंसा करून येथील जनतेचा आवाज दाबू शकत नाही. असे झाल्यास जास्त विरोध होईल. विरोध दर्शवण्यासाठी लोक रस्त्यावर येतील आणि तुमच्या विरोधात आंदोलन करतील'. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका वर्तमानपत्राचा फोटो दिसत आहे. यामध्ये जेएनयूमधील हल्ल्याची बातमी आहे

JNU Violence | JNU मध्ये नेमकं काय घडलं? ऐका मराठी प्राध्यापकाकडून | ABP Majha



ट्विंकल खन्नाच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विंकल नेहमीचं सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर परखड भूमीका व्यक्त करत असते. तिच्या या स्वभवामुळे तिला अनेकवेळा नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध होतं आहे. शहरातील अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली आहे.

संबंधित बातम्या :
JNU Attack | जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर उपस्थित झालेले प्रश्न!

JNU Attack | हल्ल्यात जखमी झालेली जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष कोण आहे?