मुंबईः अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा 'ट्युबलाईट'मधील पहिला लूक समोर आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत हा फोटो शेअर केला आहे.  सलमान या लूकमध्ये सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे.


 



सलमानचा 'ट्युबलाईट' सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमान सध्या 'ट्युबलाईट'च्या शुटिंगसाठी लडाखमध्ये आहे. या सिनेमात चीनी अभिनेत्री झू झू दिसणार आहे.

https://twitter.com/kabirkhankk/status/765105873333125120

 

सलमान या लूकमध्ये एका लष्कर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र याबाबत अजून कसलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सलमानच्या या लूकबद्दल चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे.