मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी भारत बलात्कारमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवरून सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"स्वातंत्र्य दिवसाचा संकल्प... भारत बलात्कारापासून मुक्त होवूदे", असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी 'पिंक' या सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं आहे. हा सिनेमा तीन महिलांवर आधारित असून त्याच्या ट्रेलरवरून लैंगिक शोषणावर आधारित असल्याचं दिसून येत आहे.
https://twitter.com/SrBachchan/status/764551193485910017
अमिताभ यांनी लेखिका-विनोदी कलाकार राधिका वाज यांचा एक संदेशही रिट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये "स्त्रीचं शरीर लोकशाही नसते, तर ती एक हुकूमशाही असते. हुकूमशहाने आपला भार सांभाळण्याची वेळ आली आहे." असं म्हटलं आहे.
https://twitter.com/SrBachchan/status/764545310773260288