एक्स्प्लोर

आठवणीतले अमरीश पुरी: थरकाप उडवणारा आवाज, ते काळीज चिरणारा संवाद

अमरीश पुरी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवांशहर येथे झाला.

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस. अमरीश पुरी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे  22 जून 1932 रोजी पंजाबमधील नवांशहर येथे झाला. 'मिस्टर इंडिया' मधील 'मोगॅम्बो' असो, वा 'घातक'मधील 'शंभू नाथ' किंवा 'डीडीएलजी'मधील 'बाबूजी'... अमरीश पुरींनी प्रत्येक भूमिका अजरामर केली. अमरीश पुरी यांचा 1967 पासून सुरु झालेला सिनेप्रवास शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे 2005 पर्यंत सुरु राहिला. 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. अमरीश पुरी यांची कारकीर्द - खूप कमी लोकांना माहिती आहे की, अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. 1967 सालच्या 'शांतता! कोर्ट चालू आहे' या नाटकावर आधारित सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. - समांतर सिनेमाच्या चळवळीतही अमरीश पुरी सक्रीय होते. श्याम बेनेगल, स्मिता पाटील यांच्याबरोबरही त्यांनी अनेक सिनेमे केले. वयाच्या 39 व्या वर्षी अमरीश पुरींनी 'रेशमा और शेरा' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रेशमा और शेरा' सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते. आठवणीतले अमरीश पुरी: थरकाप उडवणारा आवाज, ते काळीज चिरणारा संवाद - अमरीश पुरींनी एकूण 400 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. - 1984 साली स्टिव्हन स्पीलबर्ग यांनी 'इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम' या सिनेमात अमरीश पुरींना 'मोला राम' नावाची भूमिका दिली होती. स्पीलबर्ग यांचे सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी अमरीश पुरी एक होते. आठवणीतले अमरीश पुरी: थरकाप उडवणारा आवाज, ते काळीज चिरणारा संवाद - स्पीलबर्ग यांच्या सिनेमामुळे परदेशात अमरीश पुरींना 'मोला राम' या नावाने ओळखलं जातं. - अमरीश पुरींना टोप्यांची प्रचंड आवड होती. त्यांच्या घरी आजही वेगवेगळ्या देशांमधील जवळपास 200 टोप्यांचं कलेक्शन आहे. - अमरीश पुरी यांचे दोन्ही मोठे भाऊ म्हणजेच मदन आणि चमन पुरी हे अमरीश पुरी यांच्या आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते. मात्र, अमरीश पुरी पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये अपयशी झाले होते. त्यानंतर त्यांना एम्प्लॉईज स्टेट इंश्योरन्स कॉर्पोरेशनमध्ये काम केलं. - त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2006 मध्ये रिलीज जालेला 'कच्ची सडक' हा सिनेमा अमरीश पुरींचा शेवटचा सिनेमा. वैयक्तिक आयुष्य अमरीश पुरी यांनी उर्मिला दिवेकर यांच्यासोबत 5 जानेवारी 1957 रोजी मुंबईतील वडाळ्यातील श्रीकृष्ण  मंदिरात लगीनगाठ बांधली. अमरीश आणि उर्मिला यांना दोन मुलं आहेत. मुलगा राजीव पुरी हा व्यावसायिक आहे, तर मुलगी नम्रता डॉक्टर आहे. अमरीश पुरी यांनी 2005 मध्ये अखेरचा श्वास घेतला. 72 व्या वर्षी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचं निधन झालं. आठवणीतले अमरीश पुरी: थरकाप उडवणारा आवाज, ते काळीज चिरणारा संवाद

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget