TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांची आहे. 


Devednra Fadnavis, Amruta Fadnavis  : काही दिवसांपूर्वी भरगच्च अशा भोजनाच्या थाळीसमोर बसून जेवणाचा आस्वाद घेताना भाजप नेत्यांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) देखील होते. या फोटोवरुन काही ट्रोलरांनी फडणवीसांच्या खाण्यावरुन त्यांना ट्रोल देखील केलेलं. आता फडणवीसांच्या खवय्येगिरीबद्दल खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस हे पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या सहज खायचे, असं अमृता फडणवीसांनी सांगितलं आहे. झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या. हा एपिसोड अजून प्रसारित झालेला नाही. लवकरच हा भाग प्रसारित होणार आहे.


Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील यात कॅमिओ रोल करत आहे. मात्र, गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, आता याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, ट्रेलर पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या एका महिलेला या चित्रपटात केवळ कामाठीपुरातील एक व्यक्ती दाखवलं आहे.


Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe)'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani) मालिकेत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. डॉ. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या फोटोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"जवळपास सहा महिन्यांनंतर योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर 'महाराज' साकारण्याचा! स्वराज्य सौदामिनी ताराराणी".


MIFF 2022 : 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) (MIFF) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या साठी 15 फेब्रुवारी पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत. 1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या


Bappi Lahiri : 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना'...अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली


Box Office Clash : आमिर खान आणि अक्षय कुमार बॉक्सऑफिसवर आमने-सामने


Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचं दिग्दर्शनात पदार्पण, 'सजना' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha