Aamir Khan Vs Akshay Kumar : ऑगस्ट 2022 सिनेप्रेमीसांठी खास आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि आणि खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आमने-सामने येणार आहेत. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षयचा 'रक्षा बंधन' सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. 


'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा बैसाखीला प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा तयार न झाल्याने सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली. त्यामुळे 'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंह चड्ढा' हे सिनेमे 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'रक्षाबंधन' सिनेमात अक्षय कुमारसोबत भूमी पेडणेकरदेखील दिसणार आहे.





'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन' बॉक्सऑफिसवर टक्कर होणार आहे. स्क्रीन्ससाठीदेखील दोन्ही सिनेमांत टक्कर होऊ शकते. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर एकमेकांचे कलेक्शन कमी करताना दिसणार आहेत. 'प्रभास' आणि 'सैफ अली खान'चा 'आदिपुरुष' सिनेमादेखील 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 


संबंधित बातम्या


Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचं दिग्दर्शनात पदार्पण, 'सजना' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात


Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha