Bappi Lahiri : गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri) यांचे निधन झाले आहे. राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून बप्पी लाहिरींना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अमूल कंपनीनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून 'डिस्को किंग' बप्पी लाहिरींना श्रद्धांजली वाहिली आहे. 


अमूलने 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना' अशी कॅप्शन देत बप्पी लाहिरींचे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात बप्पी लाहिरी गाणं गाताना दिसत असून आसपास संगीतमय वातावरण दिसते आहे. बप्पी लाहिरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.






बप्पी लाहिरी यांच्या 'तम्मा तम्मा लोगे', 'डिस्को डान्सर', 'याद आ रहा है तेरा प्यार' या सुपर हिट गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांतील गाणीदेखील बप्पी लाहिरींनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.


संबंधित बातम्या


Box Office Clash : आमिर खान आणि अक्षय कुमार बॉक्सऑफिसवर आमने-सामने


MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात


Gangubai Kathiawadi Controversy : 'गंगूबाई काठियावाडी'वरून नवा वाद, मुलगा म्हणाला 'माझी आई समाजसेविका होती, पण चित्रपटात....'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha