एक्स्प्लोर

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करुन, थिएटरचं बुकिंग करुन मग निर्माते सेन्सॉरच्या दारात जायचे. हीच सवय आता अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनने 'पद्मावती'ला प्रमाणपत्र नाकारलं. अर्थात हा नियम काही आजचा नाही. पार 1952 पासून तो सेन्सॉरच्या पुस्तिकेत पडून होता. पण 'पद्मावती'ने मात्र त्याला नवसंजीवनी दिली. बोर्डाच्या वेबसाईटच्या होमपेजवर तो दिमाखात झळकू लागला. इकडे हा नियम नव्याने जागा झाला आणि 'पद्मावती'च्या भवताली असलेल्या हिंदी-मराठी सिनेमांच्या पोटात गोळा आला. आता आपलंही काही खरं नाही या भावनेने अंकुशच्या 'देवा'पासून सल्लूच्या 'टायगर'पर्यंत सगळे भैसाटून गेले. सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करुन, थिएटरचं बुकिंग करुन मग निर्माते सेन्सॉरच्या दारात जायचे. हीच सवय आता अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सगळ्यात मोठा फटका 22 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या 'टायगर जिंदा है' या सिनेमाला बसू शकतो. कारण अजूनही या सिनेमाचं काम सुरुच आहे. सलमान खानसारखा ब्रँड या सिनेमात असल्याने त्याच्यापुढे बोर्ड झुकणार का? उशिरा एन्ट्री करुनही टायगरला सर्टिफिकेट मिळणार का याची उत्तरं सर्वांनाच हवी आहेत. केवळ टायगरच नाही तर त्या आधी रिलीज होणारे फुकरे रिटर्न्स, नवाजुद्दीनचा मान्सून शूटआऊट, टायगर श्रॉफचा मुक्काबाज अशा अनेक सिनेमांचे निर्माते सध्या त्याच टेन्शनमध्ये आहेत. मराठीत काही वेगळी परिस्थिती नाही. एक डिसेंबरला रिलीज होणारा 'देवा' सिनेमा अजूनही सेन्सॉर सर्टिफिकेटच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्व चित्रपटांच्या निर्मात्यांना होल्डवर ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर 5 जानेवारीला रिलीज होणाऱ्या संजय जाधवच्या 'ये रे ये रे पैसा'चाही परिस्थिती काही वेगळी नाही. धक्कादायक बाब म्हणजे असे तब्बल 110 सिनेमे सध्या सेन्सॉरच्या सर्टिफिकेटसाठी रांगेत उभे आहेत. इकडे तापलेली हवा बघता, सेन्सॉरच्या ऑफिसमोरही पोलिस व्हॅन्स तैनात करण्यात आल्या आहेत. सर्टिफिकेटसाठी कोणाही कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असा फतवाच बोर्डाने काढला आहे. त्यामुळे साऱ्यांचेच डोळे आता सेन्सॉरच्या भूमिकेकडे लागले आहेत. लवकरच बोर्डाची मिटिंग होणं अपेक्षित असून त्यात काय निर्णय लागतो याकडे अवघी इंडस्ट्रीच्या नजरा लागून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Veteran Actress Pavala Shyamala Passes Away: आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
आर्थिक अडचणींशी झुंज, उपचारासाठी पैसे नसल्यानं रुग्णालयानं हाकललं, रस्त्यावर सैरभैर फिरताना दिसलेली दिग्गज अभिनेत्री, अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
'मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो...'; कंगनाची 'बेकार, बेरोजगार' म्हणत टीका, आता सौरव दास यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget