Tiger 3 Twitter Review: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणाऱ्या सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि  इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.   टायगर 3 या चित्रपटाचा काही नेटकऱ्यांनी मॉर्निंग शो पाहिला. टायगर 3  हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. जाणून घेऊयात  'टायगर 3' पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिलेली रिअॅक्शन...


कुणी म्हणालं 'निराशाजनक'तर कुणी म्हणतंय 'ब्लॉकबस्टर' (Tiger 3 Review)


एका नेटकऱ्यानं ट्विटरवर टायगर 3 चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "या चित्रपटाचा एकाच शब्दात रिव्ह्यू होऊ शकतो, तो शब्द म्हणजे ब्लॉकबस्टर  टायगर हा विनर आहे हा चित्रपट नक्की बघा." या नेटकऱ्यानं टायगर-3 या चित्रपटाला साडे चार स्टार्स दिले आहेत. 






आणखी एका नेटकऱ्यानं टायगर 3  या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "हा चित्रपट निराशाजनक, सलमान खान सुस्त दिसत आहे.  त्याचा स्क्रीन  प्रेजेन्स अॅनिमेटेड दिसतो."






अंगावर येतील शहारे


काही नेटकऱ्यांनी टायगर 3 चित्रपटामधील सलमानच्या एन्ट्रीचे तसेच चित्रपटामधील अॅक्शन सीन्सचे कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "सलमानचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, मनाला भिडणारे अॅक्शन सीन्स आहेत आणि हॉलिवूड लेव्हलचं प्रोडक्शन आहे. चित्रपट बघताना अंगावर शहारे येतात."




सलमान खानच्या  'टायगर 3' या स्पाय थ्रिलर चित्रपटचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या अॅक्शन सीन्सशिवाय या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ देखील आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Tiger 3: टायगर 3 रिलीज होण्याआधी सलमान आणि कतरिनानं चाहत्यांना केली 'ही' विनंती; म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की..."