Kareena Kapoor: देशभरात दिवाळीचा (Diwali 2023) सण उत्साहानं साजरा केला जात आहे. पणती लावून आणि रांगोळी काढून दिवाळी साजरी केला जाते. अनेक सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच आता अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor) खास फोटो शेअर करुन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.करीनानं शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
करीनानं शेअर केला खास फोटो
करिनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूर आणि जेह हे दोघे रांगोळी काढताना दिसत आहेत.करीना देखील तिच्या मुलांना रांगोळी काढण्यासाठी मदत करताना दिसत आहे.करीनानं शेअर केलेल्या फोटोमधील सैफ अली खानच्या हावभावांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. तैमूर, जेह आणि करीनानं काढलेली रांगोळी पाहिल्यानंतर सैफ हा चक्रावला आहे, असं फोटोमध्ये दिसत आहे. करीनानं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
फोटोला दिलं हटके कॅप्शन
करीनानं तैमूर, जेह आणि सैफचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "अय्यो जेव्हा कुटुंबाला रांगोळी काढायची की होळी खेळायची हे…काही कळत नाही,पण महत्त्वाचे हे आहे की, आम्ही मजा केली. हा सण सर्वांच्या आयुष्यात प्रेम आणि हास्य आणेल"
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
करीनानं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ही दिवळी आहे की होळी?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "तैमूरने सगळ्यात चांगली रांगोळी काढली आहे त्याला बेस्ट रांगोळीचा पुरस्कार मिळायला हवा"
करीनाचा आगामी चित्रपट (Kareena Kapoor Movie)
करीना ही लवकरच 'सिंघम 3' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती अवनी बाजीराव सिंघम ही भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी 'सिंघम 3' या चित्रपटामधीलकरीनाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. या फोटोमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग पाहायला मिळत आहे. प्रेक्षक करीनाच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी करीनाचा 'जाने जान' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. आता करीनाच्या सिंघम-3 या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या:
Singham 3 : हातात बंदूक अन् चेहऱ्यावर धगधगती आग; 'सिंघम 3'मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट