Tiger 3 Ruaan Song: अभिनेता सलमान खान (Salman khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर- 3 (Tiger 3) या चित्रपटामधील  रुआं (Ruaan) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सलमान आणि कतरिना यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. टायगर-3 चित्रपटामधले  'लेके प्रभू का नाम' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर आता रुआं गाणं रिलीज झालं आहे.


टायगर- 3 चित्रपटामधील रुआं या गाण्यात जोया आणि टायगरचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.  रुआं हे गाणे अरिजित सिंहनं गायले असून या गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे.  इर्शाद कामिल हे रुआं या गाण्याचे संगीतकार आहेत. दिल दियां गल्लां या टायगर जिंदा है या चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती आता   टायगर- 3 चित्रपटामधील रुआं या गाण्याचेही नेटकरी कौतुक करत आहेत. 


टायगर-3 चित्रपटामधले  'लेके प्रभू का नाम' या गाण्याचं अनेकांनी कौतुक केलं. या गाण्याला युट्यूबवर 73 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्यात कतरिना आणि सलमान यांचा जबरदस्त डान्स प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. आता रुआं या गाण्यात  कतरिना आणि सलमान यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. अनेक नेटकऱ्यांनी युट्यूबवर रुआं या गाण्याचे कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं युट्यूबवर कमेंट केली,  "या गाण्यात सर्वकाही अगदी परफेक्ट आहे- अरिजित + प्रीतम + इर्शाद + सलमान + कतरिना + Yrf" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "या गाण्याचे लिरिक्स खूप छान आहेत. गाणे अप्रतिम आहे."






'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण'  या चित्रपटानंतर आता  YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.सलमानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


कधी रिलीज होणार 'टायगर 3'?


'टायगर 3' या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी, सलमान खान आणि कतरिना कैफ हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा चित्रपट यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे.


संबंधित बातम्या:


Tiger 3 Advance Booking : रिलीजआधीच भाईजानच्या 'टायगर-3'नं केली बंपर कमाई ; अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केले एवढे कलेक्शन