Shah Rukh Khan Dunki Star Cast Fees : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूपच खास आहे. शाहरुखचे 'पठाण' (Pathaan), 'जवान' (Jawan) हे सिनेमे 2023 मध्ये रिलीज झाले असून या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चाहत्यांना आता त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाची उत्सुकता आहे. 'डंकी' या सिनेमासाठी किंग खानने तगडं मानधन घेतलं असल्याची चर्चा आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा सिनेमागृहात धमाका करण्यासाठी सज्ज आहे.  22 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसह विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन ईरानी आणि सतीश शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'डंकी'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

'डंकी' साठी कलाकारांनी घेतलंय तगडं मानधन (Dunki Star Cast Fees)

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान 'डंकी' या सिनेमात 'हार्डी' हे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्याने 28 कोटी रुपयांचा मानधन घेतलं आहे. 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawaan) सिनेमासाठीही अभिनेत्याने एवढं मानधन घेतलं होतं.

'डंकी' या सिनेमात विकी कौशल (Vicky Kaushal) 'सुख्खी'च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने 12 कोटी रुपये आकारले आहेत. याआधी 'संजू' या सिनेमात विकीने राजकुमार हिरानीसोबत काम केलं होतं. 'डंकी' सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) मनूच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी तिने 11 कोटी रुपये चार्ज केले आहेत. 

बोमन ईरानी यांनी 'मुन्ना भाई एम.बी.बी.एस','3 इडियट्स' आणि 'पीके' यांसारख्या सिनेमांत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. आता 'डंकी' या सिनेमात त्यांनी गुलाटी नामक एका शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी 15 कोटी रुपये आकारले आहेत. तर विनोदी टायमिंगसाठी ओळखले जाणाऱ्या सतीश शाह यांनी 'डंकी' या सिनेमाने सात कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

'डंकी' कधी होणार रिलीज? (Dunki Release Date)

'डंकी' हा सिनेमा 22 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या वर्षातला शाहरुखचा 'डंकी' हा तिसरा सुपरहिट सिनेमा असणार आहे. 'डंकी' हा पठाण आणि जवानचा रेकॉर्ड ब्रेक करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संंबंधित बातम्या

Dunki New Posters: "इनके बारे में बहुत कुछ शेयर करना अभी बाकी है"; शाहरुखने शेअर केलं डंकी चित्रपटाचं नवं पोस्टर