आमीर खानने सकाळी 11 वाजून 27 मिनिटांनी हा ट्रेलर ट्विट केला. त्यानंतर 11.47 पर्यंत या ट्रेलरला जवळपास 45 हजार लोकांनी पाहिला.
या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमिर खान, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या दिवाळीत म्हणजेच 8 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे. विजय कृष्ण आचार्य हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तर आदित्य चोप्रा या सिनेमाचे निर्माते आहेत. मराठमोळे संगीतकार अजय अतुल यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे.
आमीर खानने दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरुन या सिनेमाची घोषणा केली होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात झळकणार असल्याचं आमीरने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
फातिमाची निवड
'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या सिनेमात फातिमा सना शेखची निवड ही आमीर खानमुळे झाल्याची चर्चा होती. मात्र आमीरची पत्नी किरण रावनेच याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' हा यशराज बॅनरचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये आदित्य चोपडा, विजय कृष्ण आचार्य आणि आमीर खान या तिघांनी मिळून निर्णय घेतला. हा मोठा सिनेमा आहे, त्यामुळे निश्चितच फातिमाला विचारपूर्वकच भूमिका दिली असेल. शिवाय तिच्यात ती क्षमता आहे, त्यामुळेच तिला भूमिका मिळाली, असंही किरण रावने म्हटलं.
फातिमाने आमीरच्या 'दंगल' सिनेमात पैलवान गीता फोगाटची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं आमिरसह अनेकांनी कौतुकही केलं होतं.
'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमात आमीर आणि फातिमासोबत, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. आमीर आणि बिग बी या सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. कतरिनाने यापूर्वी 'सरकार'मध्ये बिग बींसोबत आणि 'धूम 3' मध्ये आमिरसोबत काम केलेलं आहे.