मुंबई : देशाला लुटून परदेशात पळून जाण्यासारखे गुन्हे भयंकर आहेत. अशा घोटाळेबाजांना पकडलं पाहिजे आणि धडा शिकवला पाहिजे, असे म्हणत अभिनेता सैफ अली खान याने भाराताला चुना लावून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांसारख्या घोटाळेबाजांवर निशाणा साधलाय. सैफने ‘बाजार’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी एबीपी माझाशी खास संवाद साधला.
मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये काल (26 सप्टेंबर) ‘बाजार’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सिनेमात अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे.
हजारो कोटी रुपये घेऊन देशातून पळणाऱ्या बड्या घोटाळेंबाजांबद्दल यावेळी सैफला माध्यमांनी विचारले असता, तो म्हणाला, “अशा प्रकराचे गुन्हे भयंकर आहेत. नेहमी सेलिब्रिटीजना टार्गेट केलं जातं, मात्र असे घोटाळे करणारे वाचतात.” तसेच, सैफ पुढे म्हणाला, “पैसे घेऊन देशातून पळणाऱ्यांना पकडलं पाहिजे आणि धडा शिकवला पाहिजे.”
“लोक एकमेकांवर आरोप करत असतात आणि खुश होत राहतात. मात्र आपल्याला असा लोकांवर आरोप केला पाहिजे, जे खऱ्या अर्थाने गैरकृत्य करतात आणि तुमच्याकडून तुमचा पैसा चोरतात.” असे सैफ म्हणाला.
शेअर मार्केटमध्ये अवैध मार्गाने पैसे कमावण्यावरील कथा सांगणारं थ्रिलरपट म्हणजे ‘बाजार’ सिनेमा. सैफ अली खान या सिनेमात गुजराती व्यावसायिक शकुन कोठारी नामक भूमिकेत आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ‘बाजार’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी सैफ अली खानसोबत, राधिका आपटे, चित्रांगदा सिंह, रोहन मेहरा उपस्थित होते. तसेच, सिनेमाचे दिग्दर्शक निखील अडवाणी आणि गौरव के. चावलाही हजर होते. येत्या 26 ऑक्टोबरला ‘बाजार’ सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.
देशाला लुटण्याचे गुन्हे भयंकर, घोटाळेबाजांना पकडून धडा शिकवावा : सैफ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Sep 2018 08:49 AM (IST)
शेअर मार्केटमध्ये अवैध मार्गाने पैसे कमावण्यावरील कथा सांगणारं थ्रिलरपट म्हणजे ‘बाजार’ सिनेमा. सैफ अली खान या सिनेमात गुजराती व्यावसायिक शकुन कोठारी नामक भूमिकेत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -