Barsaat Bollywood Movies Box Office Collection : बॉलिवूडच्या (Bollywood) एकाच नावाच्या तीन वेगळ्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे. हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत. बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही एकाच नावाचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. पण हे सर्व सिनेमे सुपरहिट झालेले नाहीत. पण बॉलिवूडच्या एकाच नावाच्या तीन सिनेमांनी मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. या सिनेमाचं नाव 'बरसात' (Barsaat) असं आहे. 


'बरसात'
कधी रिलीज झाला? 1949


'बरसात' हा सिनेमा 1949 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात राज कपूर आणि नरगिस मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट ठरली आहेत. आजही या सिनेमातील 'हवा में उडता जाए मेरा लाल दुपट्टा', 'जिया बेकरार है' आणि 'बरसात में हमसे मिले' ही गाणी ऐकायला प्रेक्षकांना आवडतात. राज कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. 


1949 मध्ये आलेल्या 'बरसात' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला होता. तसेच राज कपूर यांच्या करिअरमधल्या सुपरहिट सिनेमांमध्ये या सिनेमाची गणना होते. काश्मीरमध्ये शूट होणारा हा पहिला सिनेमा होता. 35 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने त्याकाळी दोन कोटी रुपयांची कमाई केली.


बरसात
कधी रिलीज झाला? 1995


'बरसात' हा सिनेमा 1995 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून बॉबी देओल आणि ट्विंकल खन्नाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि हे दोन्ही स्टारकिड्स रातोरात सुपरस्टार झाले. आठ कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 35 कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमातील 'हमको सिर्फ तुमसे प्यार है' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.


बरसात
कधी रिलीज झाला? 2005


बॉबी देओलचे 'बरसात' नावाचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2005 मध्ये आलेल्या 'बरसात' या सिनेमात बिपाशा बसू आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. 10 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींची कमाई केली. या सिनेमातील 'बरसात के दिन आए' हे गाणं सुपरहिट ठरलं. 


संबंधित बातम्या


Top 5 Banned Movies : या 5 चित्रपटात अभिनेत्रींनी लाज सोडून दिल्याने चित्रपट थेट YouTube वर रिलीज झाले; सेन्साॅरने परवानगी दिलीच नाही!