Top 5 Banned Movies in Bollywood : चित्रपट निर्मितीच्या स्वातंत्र्याखाली बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट झाले आहेत जे वादाचे केंद्रबिंदू झाले आहेत. त्यामुळे सेन्साॅरने परवानगी न दिल्याने (Top 5 Banned Movies in Bollywood) सुद्धा बरीच चर्चा झाली. बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, पण काही चित्रपट असेही आहेत ज्यांना प्रदर्शित होण्यापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. या चित्रपटांना प्रदर्शित न होण्यामागे बोल्ड सीन हेच कारण ठरले. 


वाचा : Jawan OTT Release : शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांना मनोरंजनाची 'ट्रीट'; 'जवान' ओटीटीवर रिलीज


सेन्सॉर बोर्डाकडून बंदी घालण्यात आल्यानंतर चित्रपटांच्या निर्मात्यांनी हे चित्रपट यूट्यूबवर रिलीज केले. त्यानंतर हे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पाहिले. या अशाच काही चित्रपटांची नावे सांगत आहोत, ज्यांना सेन्सॉर बोर्डाने खूप बोल्ड सीन केल्‍यामुळे बंदी घातली होती आणि त्‍याचे YouTube वर रिलीज झाले. 


1. URF प्रोफेसर (Urf Professor)


या चित्रपटाची निर्मिती पंकज अडवाणी यांनी केली होती. या चित्रपटात अश्लीलता दाखवल्यामुळे चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती, मात्र नंतर तो यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी, अंतरा माळी हे प्रमुख कलाकार होते.


2. अनफ्रीडम (Unfreedom)


अनफ्रिडम चित्रपटाची निर्मिती 2014 मध्ये करण्यात आली. तो चित्रपट समलैंगिकतेवर आधारित होता. या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती, त्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित केला होता.


3. कामसूत्र 3D (Kamasutra 3D)


या चित्रपटातील अतिशय बोल्ड सीन्समुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर बंदी घातली. या चित्रपटातील अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि आभा पॉल होत्या. हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता, त्यानंतर हा चित्रपट फक्त यूट्यूबपुरता मर्यादित होता.


4. सिन्स (Scene)


'सिन्स' चित्रपटात अनेक ठिकाणी न्यूड सीनही शूट करण्यात आले होते. तसेच, जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा बराच वाद झाला. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर बंदी घातली आणि हा चित्रपट देखील यूट्यूबपुरता मर्यादित राहिला.


5. द पेंटेड हाउस (The Painted House)


द पेंटेड हाऊसमध्ये खूप बोल्ड सीन्सही दाखवण्यात आले होते, त्यामुळे या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती, मात्र आता हा चित्रपट यूट्यूबवर पाहता येतो.


इतर महत्वाच्या बातम्या