Shah Rukh Khan Jawan OTT Release : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मध्यरात्री त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर गर्दी केली होती. आता अभिनेत्यानेही चाहत्यांना वाढदिवशी मनोरंजनाची 'ट्रीट' दिली आहे. 'जवान' ओटीटीवर (Jawan OTT Release) रिलीज झाला आहे.


'जवान' कुठे पाहता येईल? (Where Watch Shah Rukh Khan Jawan on OTT)


शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. शाहरुखचा वाढदिवस आहे. पण भेट मात्र चाहत्यांना मिळाली आहे. 'जवान' ओटीटीवर रिलीज होण्याआधी शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो म्हणत होता,"हॅलो नेटफ्लिकसवा, ओळखा पाहू मी कुठे आहे? पुढच्या दोन मिनिटात 'जवान' नेटफ्लिक्सवर रिलीज करा. नाहीतर मी तुमच्या टुडुमचा बुडूम करेल". त्यानंतर लगेचच 'जवान' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला.






'जवान'चं एक्सटेंडेज वर्जन


शाहरुखच्या 'जवान'चं एक्सटेंडेज वर्जन नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आलं आहे. हा सिनेमा तुम्हाला हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत पाहायला मिळेल. किंग खानच्या वाढदिवशी सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 


कोट्यवधी रुपयांत विकलेत 'जवान'चे राइट्स


'जवान' या सिनेमाची निर्मिती 300 कोटींमध्ये करण्यात आली आहे. पण या सिनेमाचे राइट्स नेटफ्लिक्सने 250 कोटींमध्ये विकत घेतले आहेत. 'जवान' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडपट 'जवान' ठरला आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत या सिनेमाने इतिहासही रचला आहे.


'जवान' या सिनेमात शाहरुख खानसह विजय सेतुपती आणि नयनतारादेखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची झलक पाहायला मिळाली आहे. संजय दत्तदेखील या सिनेमात झळकला आहे. 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एटली कुमारने (Atlee Kumar) सांभाळली आहे.


'जवान' हा 2023 मधला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 1100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. शाहरुखच्या करिअरमधला हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आता अभिनेत्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Dunki Teaser Out : शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट; 'डंकी'चा धमाकेदार टीझर आऊट