एक्स्प्लोर

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा आगामी दोन वर्षात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या या तिन्हीही सिनेमांची निर्मिती प्रक्रिया सुरु असून 2018 आणि 2019 मध्ये हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा आगामी दोन वर्षात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या या तिन्हीही सिनेमांची निर्मिती प्रक्रिया सुरु असून 2018 आणि 2019 मध्ये हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजा 'छत्रपती शिवाजी' या सिनेमाची निर्मिती करणार करणार असून विशेष म्हणजे रितेश देशमुख यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाचं बजेट किती? छत्रपती शिवरायांवरील या मराठी सिनेमाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असेल, असं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर रितेशचा दिग्दर्शक मित्र राम गोपाल वर्मानेही छत्रपती शिवाजी या सिनेमाचं बजेट 225 कोटी असेल असं ट्विट केलं होतं. त्याबाबत बोलताना रितेश म्हणाला, “सध्या तरी सिनेमाचा स्क्रीनप्ले/पटकथा निश्चित झाली आहे. आता सिनेमाचं प्री प्रॉडक्शनचं काम सुरु होईल. त्यानंतर सिनेमाचं बजेट ठरवलं जाईल” तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय देवगण अभिनेता अजय देवगणने 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमात अजय देवगणच तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसेल. 2019 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'लोकमान्य एक युगपुरुष' या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तानाजी मालुसरे यांचं "आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेलं वाक्य सर्वांच्याच परिचयाचं आहे. भारताच्या दैदीप्यमान इतिहासात तानाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे. त्‍यांच्‍या जाण्‍याने छत्रपती शिवरायही हळहळले होते आणि ‘गड आला पण माझा सिंह गेला' असे भावनिक उद्गार काढले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा शूर मावळा तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पदड्यावर पाहायला मिळणार आहे. मणिकर्निका : द क्वीन ऑफ झांसी झाशीची राणी लक्ष्मीबाईंची शौर्यगाथाही 2018 मध्ये मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. दिग्दर्शक क्रिश या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अभिनेत्री कंगना रणावत झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. संबंधित बातम्या :

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

छत्रपतींची प्रतिष्ठा जपायची आहे : रितेश देशमुख

बाहुबलीनंतर रितेशचा भव्यदिव्य ‘शिवाजी’, राम गोपाल वर्मांकडून ट्विटरवरुन कौतुक  

युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच मोठ्या पडद्यावर, जेनेलिया-रितेशचा मेगा प्लॅन 

महत्त्वाच्या बातम्या

Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Alpha Review: स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय
स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन, दरड कोसळून दोघे अडकले; शोधमोहिम सुरू, प्रशासन अलर्ट मोडवर
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
Embed widget