Thor Love And Thunder Box Office Collection : हॉलिवूडचा सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) हा सिनेमा नुकताच जगभरात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच विकेंडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतात या सिनेमाने अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांना मागे टाकलं आहे. 


पहिल्या विकेंडला 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' चा भारतात धमाका


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी या सिनेमाने रिलीजच्या एक दिवस आधीच भारतात 18 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे विकेंडला हा सिनेमा चांगलाच धमाका करणार अशी शक्यता वर्तवली गेली होती. रिलीजच्या पहिल्या विकेंडला या सिनेमाने 64.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. 






'थोर लव्ह अॅन्ड थंडर'ची कमाई


हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थचा 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतात रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी या सिनेमाने 18.20 कोटींची कमाई केली आहे. तर शुक्रवारी या सिनेमाने 11.40 कोटी, शनिवारी 16.80 कोटी आणि रविवारी या सिनेमाने 18.40 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


अॅक्शनचा तडका असलेला 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा हा 29 वा सिनेमा आहे. या सिनेमात थोर अॅक्शनसह रोमॅंटिक अंदाजातदेखील दिसणार आहे. हा सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. टायका वायटीटीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Thor Love And Thunder : 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धमाका; बॉलिवूड सिनेमांना टाकलं मागे


Thor Love And Thunder : रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धुमाकूळ; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई