Thor Love And Thunder Day 1 Collection In India : हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 


Thor Love And Thunder रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा 7 जुलैला भारतात प्रदर्शित झाला आहे. मार्वल स्टूडिओजच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता हा सिनेमा रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 18.60 कोटींचा गल्ला जमवला आहे. 






'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमाने 2017 साली रिलीज झालेल्या थोर-रेगनरॉक या सिनेमालादेखील मागे टाकलं आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 7.77 कोटींची कमाई केली होती. आता क्रिस आणि तायका वेट्टीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमाची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती. 


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' सोशल मीडियावर चर्चेत


'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा हा 29 वा सिनेमा आहे. या सिनेमात थोर अॅक्शनसह रोमॅंटिक अंदाजातदेखील दिसणार आहे. हा सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. टायका वायटीटीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम केलं आहे. 


संबंधित बातम्या


Vikram Hospitalized : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली; चैन्नईतील रुग्णालयात दाखल


Pravin Tarde : प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित; खास पोस्ट शेअर करत दिली माहिती