एक्स्प्लोर

'हे' पाच हिंदी सिनेमे पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार!

भारतात जिथे थिएटर्स खुली होतील तिथे गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारी काही निर्मात्यांनी चालवली आहे. लवकरच पाच चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत.

मुंबई : येत्या 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी केंद्राने दिली असली तरी अद्याप महाराष्ट्र सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात थिएटर्स बंद असतील. असं असलं तरी उर्वरित भारतात जिथे थिएटर्स खुली होतील तिथे गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारी काही निर्मात्यांनी चालवली आहे. हे बळ त्यांना दिलं ते अर्थात ओटीटी व्यासपीठांनी.

अनेक चित्रपट लॉकडाऊन लागण्यापूर्वी थिएटरवर लागले. यात वॉर, तान्हाजी-द अनसंग वॉरिअर, थप्पड, मलंग या सिनेमाचा समावेश होतो. यातले अनेक चित्रपट थिएटरवर गाजले. यात तान्हाजी, थप्पड यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. इतर चित्रपटांना थिएटरवर समाधानकारक प्रतिसाद होता. पण लॉकडाऊन लागल्यानंतर यातले अनेक चित्रपट टीव्हीवर आले. टीव्हीवर आल्यानंतर त्या त्या चॅनलनी आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे सिनेमे आणले. तिथे त्यांना मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक होता. उदाहरणार्थ, मलंग हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यात दिशा पटनी, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू, अमृता खानविलकर अशी मंडळी होती. हा सिनेमा थिएटरवर पडला तरी ओटीटीवर तो तुफान चालला. इतका की लॉकडाऊन काळातच मलंगचा दिग्दर्शक मोहित सुरीने याच्या पुढच्या भागाची जुळवाजुळव सुरु केली. थप्पड हा अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपटही बराच वाखाणला गेला. वॉर, शुभमंगल ज्यादा सावधान हे चित्रपटही आता पुन्हा एकदा लॉकडाऊन रिबूटनंतर पुन्हा प्रदर्शित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

सुशांत सिंह राजपूतची केदारनाथही प्रदर्शित होणार अनेक चित्रपट आता पुन्हा एकदा थिएटरवर वर्णी लावणार आहेत. यात याआधी पीएम नरेंद्र मोदी, खालीपिली या चित्रपटांनी हे जाहीर केलं आहेच. आता इतर चित्रपटांप्रमाणेच सुशांतसिंह राजपूत, सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांतबद्दल भारतभरात उसळलेली लाट लक्षात घेऊन त्याला आदरांजली म्हणून हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मनोदय असल्याचं चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Embed widget