एक्स्प्लोर

'या' सेलिब्रिटींचाही श्रीदेवीप्रमाणे बाथटबमध्ये बुडून मृत्यू!

श्रीदेवीचा मृत्यू हा बाथटबमध्ये बुडून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. बाथटबमध्ये बुडून मृ्त्यू झाल्याचं समोर आल्याने तिच्या चाहत्यांनी आणि भारतातील अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. पण परदेशात अशा घटना अनेकदा घडल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : श्रीदेवीचा मृत्यू हा बाथटबमध्ये बुडून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. बाथटबमध्ये बुडून मृ्त्यू झाल्याचं समोर आल्याने तिच्या चाहत्यांनी आणि भारतातील अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. पण परदेशात अशा घटना अनेकदा घडल्याचं समोर आलं आहे. जपान आणि अमेरिकेत अशा घटनांमध्ये काही सेलिब्रिटींचा मृत्यू झाला होता. मार्च 2017 मध्ये छापण्यात आलेल्या जनरल ऑफ जनरल फॅमिली अॅण्ड मेडिसीनच्या रिपोर्टनुसार, जपानमध्ये वर्षाला 19 हजार लोकांचा मृत्यू बाथरुममध्ये होणाऱ्या अपघातात होतो. असं म्हटलं आहे. जपानमधील एका एजन्सीने दिलेल्या रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, मागील 10 वर्षामध्ये बाथटबमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनेत तब्बल 70% वाढ झाली आहे. या घटनेत 10 पैकी 9 व्यक्ती या 65 वर्षाहून अधिक वयाचे आहेत. जपानप्रमाणेच अमेरिकेतही ही प्रमाण अधिक आहे. अमेरिकेने 2006 साली जारी केलेल्या मृत्यूदर आकड्यांमध्ये असं म्हटलं होतं की, दररोज कमीत कमी एका अमेरिकन नागरिकाचा बाथटब, हॉट टब किंवा स्पामध्ये मृत्यू होतो. ज्यापैकी बरेच लोकं हे दारु किंवा अंमली पदार्थाचे सेवन करणारे असतात. अभिनेत्री जुडी गारलॅण्ड : श्रीदेवीप्रमाणे परदेशातील काही बड्या सेलिब्रिटींचाही बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. 1960 मध्ये गायक आणि अभिनेत्री जुडी गारलॅण्ड हिचा मृत्यू देखील बाथटबमध्येच झाला होता. जास्त प्रमाणात ड्रग्ज घेतल्याने तिचा बाथटबमध्येच मृत्यू झाला होता. जिम मॉरिसन : 1970 साली पॅरिसमध्ये जिम मॉरिसन याचा देखील बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. तो एक गायक होता. पण त्याचं शवविच्छेदन झालं नव्हतं. पण असं म्हटलं जातं की, त्याचाही मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे च झाला होता. विटनी ह्यूस्टन : 2012 साली अमेरिकेची प्रसिद्ध पॉप सिंगर विटनी ह्यूस्टनचा मृत्यूदेखील बाथटबमध्ये बुडून झाला होता. अंमली औषधांच्या सेवनाने तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच वेळी ती बाथटबमध्ये पडली. त्यामुळे तिथेच बुडून तिचा मृत्यू झाला. बॉबी क्रिस्टीना ब्राऊन : 2015 साली पॉप सिंगर विटनी ह्यूस्टन हिची मुलगी बॉबी क्रिस्टीना ब्राऊन हिचा देखील मृत्यू बाथटबमध्ये पडल्याने झाला होता. दारुचं अतिरिक्त सेवन केल्यानं तिचा मृ्त्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Part 1 Ranbir Kapoor: 'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
'रामायण: पार्ट 1' मधून प्रेक्षकांना मोठं सरप्राइज, रणबीर कपूर साकारतोय डबल रोल, प्रभू श्रीराम व्यतिरिक्त 'या' भूमिकेत झळकणार
Medha Manjrekar cancer: 'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
'लोक मला देवाचे फोटो पाठवायचे...', मेधा मांजरेकरांनी सांगितला कॅन्सर निदान झाल्यानंतरचा 'तो' किस्सा, म्हणाल्या...
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील चक्रावणारी घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील चक्रावणारी घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget