एक्स्प्लोर
सलमानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी, कामवालीवर गुन्हा
![सलमानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी, कामवालीवर गुन्हा Theft At Salmans Sister Arpitas Home सलमानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी, कामवालीवर गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/23120433/04-Arpita-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खान-शर्माच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी अर्पिताच्या घरातील लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.
अर्पिता खान मुंबईतील वांद्रे परिसरातील पॅसिफीक हाईट्स इमारतीत राहते. रविवारी अर्पिता आणि तिचा नवरा आयुष शर्मा सुट्टीनिमित्त बाहेर फिरायला गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
ही चोरी रविवारपूर्वीच झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान अर्पिताच्या घरी काम करणारी आफसा नावाची कामवाली 30 जुलैपासून बेपत्ता आहे. पोलिस या बेपत्ता कामवालीचा शोध घेत आहेत.
या कामवालीवर 381 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत 2.25 लाखांची रोख रक्कम, 10 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि डिझायनर कपडे असा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)