Salman Khan Promote Covid 19 Vaccination : कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारदेखील विशेष पाऊले उचलत आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्ह्यांमध्येदेखील वेगवेगळे उपाय केले जात आहेत. अशातच सलमान खानला महाराष्ट्र सरकारने विशेष जबाबदारी दिली आहे. सलमान आता जनतेला लस घेण्याचा सल्ला देणार आहे. 


महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. या योजने अंतर्गत सरकारने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता सलमान नागरिकांमध्ये लस घेण्याबबात जनजागृती करणार आहे. 


लसीकरणात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये हा वेग कमी आहे. यात प्रामुख्याने मुस्लिम भागाचा समावेश आहे. त्यामुळेच या भागात लस घेण्याबाबत जागरूकता व्हावी यासाठी अभिनेता सलमान खानची मदत घेतली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अभिनेत्यांची मतं नागरिकांना पटतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा ते आदरही करतात.


राज्यात आज 1003 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1052 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 70 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के आहे. राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 11 हजार 766  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1 लाख 517  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1056  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,42,67,353 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut : 'दुसरा गाल पुढे केल्यानं भिक मिळते स्वातंत्र्य नाही'; कंगना पुन्हा बरळली


मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर, नाना पाटेकर, संजय राऊतांसह 'या' दिग्गजांचा गौरव


Mike Tyson ने लायगर सिनेमाच्या सेटवर चावला Ananya Panday चा कान


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha