Ananya Panday Upcoming Movie Liger : अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या तिच्या आगामी लिगर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची शूटिंग ती बॉक्सर माइक टायसनसोबत करत आहे. अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर माइकसोबतचा एक विचित्र फोटो शेअर केला आहे. या फोटोत माइक अनन्याचा कान चावताना दिसतो आहे.





1997 साली इव्हेंडर होलीफिल्डसोबत लढताना माइकने मोठे भांडण केले होते. त्यामुळे त्याला त्याचे कानदेखील कापावे लागले होते. पुढे तो लढा 'द बाइट फाइट' म्हणून ओळखला जाऊ लागला. अनन्याने काळ्या रंगाचा पूर्ण बाह्यांचा क्रॉप टॉप परिधान केला आहे, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तर माइकने करड्या रंगाचा टी-शर्टमध्ये डॅशिंग दिसत आहे. फोटोमध्ये अनन्या नौटंकी करताना दिसत आहे. 


टॉलिवूड सुपरस्टार विजय देवरकोंडा, दिग्दर्शक पुरी दगन्नाथ, अनन्या, माइक आणि लायगर सिनेमाची टीम सध्या सिनेमाच्या शूटिंगसाठी लास वेगासमध्ये आहे. लायगर सिनेमाच्या टीमने माइक आणि त्याच्या पत्नीसाठी खास भारतीय जेवणाचे आयोजन केले. नान, बटर चिकन, तंदुरी चिकन, मासे, बिर्याणी, कोबी, पालक, पनीर, समोसे, कबाबवर माइकने ताव मारला. लायगर सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha