Kangana Ranaut Controversy : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut)  वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगनाने केले होते. या वक्तव्यानंतर अनेकांनी कंगनाला ट्रोल केले.  अनेकांनी तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी  केली होती. या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत कंगना सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहे. नुकतीच कंगनाने एक पोस्ट सोशल मीडियावर केली. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. 


कंगनाची पोस्ट


इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहीले, 'तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.' कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, 'जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, त्यांच्या मते, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मिळते,  विचार करून तुमचे हिरो निवडा.' पुढे कंगना म्हणाली, 'गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे समर्थन करताना विचार करा. तुम्ही एकाच वेळी दोघांचे समर्थक असू शकत नाही.  त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देणे पुरेसे नाही. असे करणे अत्यंत बेजबाबदार आहे. त्यामुळे तुमचे आदर्श निवडताना योग्य तो विचार करा.  '




कंगना पुन्हा बरळली: पद्मश्री पुरस्कार पुन्हा करते, पण...


काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनानं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, 'स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का?  सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं.'




Kangana Ranaut : 1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं, कंगना रनौत बरळली!