The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. काही प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. तर काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. भारतामध्ये रिलीज झाल्यानंतर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. भारतामधील काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी देखील घालण्यात आली आहे. आता हा चित्रपट  यूकेमध्ये  प्रदर्शित होणार आहे. याबाबत अभिनेत्री अदा शर्मानं (Adah Sharma) एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. 


अदा शर्मानं सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक कुत्रा दिसत आहे. त्या कुत्र्याला अदा ही फोनमध्ये काही तरी दाखवताना दिसत आहे. अदानं या फोटोला कॅप्शन दिलं, 'फायनली!!!  द केरळ स्टोरी यूकेमध्ये रिलीज होत आहे. मी माझ्या नवीन मित्राला माझे हत्तीसोबतचे व्हिडिओ दाखवत आहे.  पण माझ्या नव्या मित्राला सर्व व्हिडीओ दाखवावे लागतील, नाही तो क्या दोस्ती!'


अदानं शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आम्ही द केरळ स्टोरी-2 ची वाट बघत आहोत. '


गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट देशातील विविध राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला पण पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली होती. 






'द केरळ स्टोरी' चित्रपटातील कलाकार


अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.  द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदा शर्माच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर अनेक जण या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अदाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


The Kerala Story Controversy: 'द केरळ स्टोरी'मध्ये दहशतवाद्याची भूमिका साकरलेल्या अभिनेत्यानं सांगितला किस्सा; म्हणाला 'मी घाबरलो, काही दिवस झोपलो नाही...'