The Kerala Story Controversy: द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी  वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर देखील अनेकांनी या चित्रपटावर टीका केली. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म, असं म्हटले. आता 'द केरळ स्टोरी' चित्रपटामधील अभिनेता विजय कृष्णाने (Vijay Krishna) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाला विजय?



विजय कृष्णाने द केरळ स्टोरी  या चित्रपटात ISIS दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. काही लोक  'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म म्हणत आहेत. याबाबत एका मुलाखतीमध्ये विजय कृष्णाने सांगितलं, 'सुरुवातीला अनेक लोक या चित्रपटाला प्रपोगंडा फिल्म  म्हणत होते, पण आता चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या विचारात बदल झाला असून अनेकांनी  मेसेज करून माफी मागितली आहे.'


पुढे विजयनं सांगितलं, चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी जेव्हा लोक टीका करत होते तेव्हा मी घाबरलो.चित्रपटामागील आमची विचारसरणी अशी नव्हती. आम्ही एक मानवी कथा दाखवण्याचा प्रयत्न करत होतो आणि खरोखरच आमचा उद्देश चार मुलींवर झालेल्या आघातांवर प्रकाश टाकणे हा होता, परंतु जेव्हा लोकांनी टीका करायला सुरुवात केली तेव्हा मी अस्वस्थ झालो आणि काही दिवस झोपलो नाही. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि 2-3 दिवसांनी आम्ही पाहिले की लोक चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. 






'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मासोबतच योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन  (Sudipto Sen) यांनी केलं आहे. देशभरात हा सिनेमा 1300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.विविध ठिकाणी या सिनेमाचे खास शो आयोजित करण्यात आले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Adah Sharma: अदा शर्मा नाही तर 'हे' खरं नाव; 'द केरळ स्टोरी' मधील अभिनेत्रीनं सांगितलं नाव बदलण्याचं कारण