Pune FTII : पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (Film and Television Institute of India) या संस्थेत सिनेसृष्टीशी संबंधित अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. आता या शिक्षण संस्थेतील मुलं कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. संस्थेने एका विद्यार्थाला बॅचमधून काढून टाकल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे.


एफटीआयआयच्या (FTII) विद्यार्थी संघटनेच्या म्हणण्यानुसार, 10 एप्रिल 2023 रोजी कळवण्यात आलं की, 2020 सालच्या बॅचमधील पाच विद्यार्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता संस्थेतून काढून टाकण्यात आले आहे. यातील पाच पैकी चार विद्यार्थ्यांची हकालपट्टी नंतर मागे घेण्यात आली असली तरी एका विद्यार्थ्यावर केलेली कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


विद्यार्थी संघटनेनं निदर्शनास आणू दिलं आहे की, एफटीआयआय या संस्थेने हकालपट्टीसाठी क्रेडिट आणि उपस्थितीची कमतरता अशी कारणे दिली आहेत. त्यामुळे आता 2020 च्या बॅचमधील विद्यार्थांनी जाहीर केलं आहे की,"सर्व पाच विद्यार्थांची हकालपट्टी रद्द होईपर्यंत पुढच्या बॅचचे सर्व सुरू होऊ दोणार नाही". 


'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्सिटट्यूट ऑफ इंडिया' ही पुण्यातील नामांकित संस्था आहे. आता या संस्थेतील 2020 च्या बॅचमधील विद्यार्थी सोमवारी संध्याकाळपासून कॅम्पसमध्येच बेमुदत उपोषणाला बसले आहेत. एका विद्यार्थाला बॅनमधून काढून टाकल्याचा आरोप विद्यार्थांनी केला आहे. 


'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्सिटट्यूट ऑफ इंडिया' या संस्थेने 1 मे रोजी तातडीची शैक्षणिक परिषदेसंदर्भातली बैठक बोलावली होती. या बैठकीत चार विद्यार्थांची हकालपट्टी अटींवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उरलेल्या एका विद्यार्थाला पुढच्या बॅचसह दुसरे सत्र पुन्हा करण्याचे सांगून त्याला प्रवेश शुल्क भरण्यास सांगण्यात आले. 


एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, बहिष्कृत विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. पण प्रशासन मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतं. विनंती करुनही प्रशासन त्याच्या समस्येकडे लक्ष देत नव्हतं. त्यामुळे इतर चार मुलांप्रमाणे याही विद्यार्थाला परत घ्यावे. या पाच मुलांमध्ये भेदभाव करू नये अशी विद्यार्थी संघटनेची मागणी आहे.


फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था अभिनयाचे प्रशिक्षण देण्यासाठी लोकप्रिय आहे. मात्र, इथे सिनेमाचा अविभाज्य भाग असणाऱ्या दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग अशा बाबींचेही प्रशिक्षण दिले जाते. शिवाय साउंड रेकॉर्डिंग, कलादिग्दर्शन, अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स यांचेही अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. याशिवाय संस्थेमार्फत अनेक छोटे अभ्यासक्रमही चालवले जातात.


संबंधित बातम्या


FTII Recruitment 2023 : FTII मध्ये अनेक पदांवर भरती; सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजच करा अर्ज