The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. काही प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. तर काही लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांनी दिग्दर्शित केलेला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. रिलीज झाल्यानंतर काही दिवसातच या चित्रपटानं 50 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं सहा दिवसांचे कलेक्शन
5 मे रोजी 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं सहा दिवसात 68.86 कोटी एवढी कमाई केली आहे. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टनुसार 'द केरळ स्टोरी' या चित्रपटानं ओपनिंग-डेला 8.03 कोटी एवढी कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 11.22 कोटी आणि 16.40 कोटी कमाई केली. त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.07 कोटींची कमाई केली आणि पाचव्या दिवशी या चित्रपटानं 11.14 कोटी कमावले. आता सहाव्या दिवशी या चित्रपटानं 12 कोटींची कमाई केली आहे.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. द केरळ स्टोरी या चित्रपटामधील अदा शर्माच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर अनेक जण या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अदाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. या चित्रपटात अदानं शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे. हसी तो फसी, कमांडोः2, कमांडो 3 या चित्रपटांमध्ये अदानं काम केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी हा चित्रपट देशातील विविध राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला पण पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटावर टीका केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :