Amruta Khanvilkar: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अमृता ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. अमृतानं नुकतेच तिचे लंडनमधील काही खास फोटो शेअर केले. या फोटोला एका नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. 


अमृतानं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये ती ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये दिसत आहे. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,मॅडम  द केरळ स्टोरीला .. ‘मराठी इंडस्ट्री सपोर्ट का करत नाही? सर्व तरुण युवक या चित्रपटाला प्रमोट करतात. तर लोकांची आपेक्षा आहे की. आघाडीचा फॅन बेस असणाऱ्या कलकारांनी देखील या चित्रपटाला सपोर्ट केला पाहिजे.मला माहित आहे की हे तितके सोपे नाही.'


अमृताचा रिप्लाय


नेटकऱ्याच्या कमेंट्ला अमृतानं रिप्लाय दिला,  'कारण मी लंडनमध्ये आहे. अजून मी तो चित्रपट पाहिला नाही. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट मी पाहिला आहे आणि प्रमोट देखील केला आहे. तुम्ही पाहिला का?'






अमृतानं महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिल्यानंतर एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं,  महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट  अनुभवून बघा प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघताना डोळे भरून येतात ... अंगावर रोमांच उभे राहतात .... उर अभिमानाने भरून येतो
उत्तम दिग्दर्शन .... छायाचित्रण .... अभिनयाने .... ने नटलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे.'