Jug Jugg Jeeyo Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणीचा (Kiara Advani) 'जुग जुग जियो' (Jug Jugg Jeeyo) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात रिलीज झाला आहे. विकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. पण आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळे निर्मात्यांना आर्थिक फटका बसला आहे. 


रिलीजच्या पाचव्या दिवशी निर्मात्यांना बसला आर्थिक फटका


'जुग जुग जियो' या सिनेमाने ओपनिंग डेला 9.28 कोटींची कमाई केली आहे. तर शनिवार आणि रविवारी विकेंडला या सिनेमाने चांगलीच कमाई केली. शनिवारी 12.55 कोटी तर रविवारी या सिनेमाने 15.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सोमवारी या सिनेमाने फक्त 4.82 कोटी आणि मंगळवारी 4.52 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 46.27 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे निर्मात्यांना रिलीजच्या पाचव्या दिवशी चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. 






कियारा अडवाणी, वरुण धवनचा 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी दिसत आहेत. 


तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा


नीतू कपूर आणि अनिल कपूर 'जुग जुग जिओ' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे. 


संबंधित बातम्या


Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही; कमाईच्या बाबतीत पडला मागे


Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection : बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जियो’चा धुमाकूळ; तीन दिवसात कमावले 60 कोटी