Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection : जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. जुग जुग जियो या चित्रपटाचं प्रेक्षक आणि क्रिटिक्स हे दोघेही कौतुक करत आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 9.28 कोटींची कमाई केली. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसात या चित्रपटानं 60.84 कोटींची कमाई जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली आहे. वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटानं 60.84 कोटींची कमाई केल्याचा उल्लेख केला आहे. या पोस्टला वरुणनं कॅप्शन दिलं, 'धमाका, जगभरातील प्रेक्षकांचे आभार'
पाहा पोस्ट
भारतामध्ये देखील कोट्यवधींची कमाई जगभरातील बॉक्स ऑफिस बरोबरच भारतामध्ये देखील जुग जुग जियो या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं भारतामध्ये तीन दिवसात 36.93 कोटींची कमाई केली आहे.
'जुग जुग जियो' या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच, धर्मा प्रोडक्शन, वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी ‘सुपरस्टार सिंगर 2’ या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. 'जुग जुग जियो' चित्रपटातील 'रंगसारी', 'नाच पंजाबन' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि अभिनेता मनीष पॉल हे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
हेही वाचा: