Documentary : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' (Gopal Nilkanth Dandekar - Kille Pahilela Manus) हा माहितीपट देशभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. गो. नी. दांडेकर यांच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा माहितीपट असणार आहे.
'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' या माहितीपटाची निर्मिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानं केली आहे. पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमधील लेडी रमाबाई हॉलमध्ये 2 एप्रिल म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत हा माहितीपट विनामूल्य दाखवण्यात येणार आहे.
गो. नी. दांडेकर कोण आहेत?
गो. नी. दांडेकर यांना 'गोनीदा' असेही म्हटले जाते. गो. नी. दांडेकर हे मराठीतील अग्रगण्य कादंबरीकार आणि दुर्गभ्रमंतीकार आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात गडकिल्ल्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला होता. त्यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंतीमध्ये झोकून दिलं होतं. गो. नी. दांडेकरांनी किल्ले-दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन आणि शिवतीर्थ रायगड अशी पुस्तके लिहिले आहेत. त्यांनी या पुस्तकांमधून गडकिल्ले कसे पाहावेत याचं सर्वसामान्यांना मार्गदर्शन केलं आहे.
गडकिल्ले ही स्फूर्तिस्थानं आहेत आणि त्यांचं जतन संवर्धन हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, या दृष्टिकोनातून 'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' हा माहितीपट बनवण्यात आला आहे. हा माहितीपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. गोपाळ नीलकंठ दांडेकरांच्या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली आहेत. 1 जून 1998 रोजी पुण्यात गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे निधन झाले.
संबंधित बातम्या
पुन्हा ढोलकीच्या तालावर! तमाशाची पंढरी नारायणगावात दोन वर्षांनंतर फड रंगले
KGF Chapter 2 : यशने लिहिलेत 'KGF 2' सिनेमातील डायलॉग, दिग्दर्शकाने केला खुलासा
Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha