Jaya Bachchan: गेल्या काही दिवसांपासून 'द आर्चीज' (The Archies) या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर मंगळवारी (5 डिसेंबर) मुंबईत आयोजित करण्यात आला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda), शाहरुख खानची ( Shah Rukh Khan)  मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor)  हे  'द आर्चीज'  या चित्रपटामधून पदार्पण करत आहेत. 'द आर्चीज'  च्या प्रीमियरला बच्चन कुटुंबाने हजेरी लावली होती. या प्रीमियरमधील जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन नेटकऱ्यांनी जया बच्चन यांना ट्रोल केलं आहे.


पापाराझीवर भडकल्या जया बच्चन


जया बच्चन यांच्या 'द आर्चीज' चित्रपटाच्या प्रीमियरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जया बच्चन या फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसते की पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी हाक मारतात. अशातच जया बच्चन या फोटोग्राफर्सला 'ओरडू नका!' असं म्हणतात.


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


जया बच्चन यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "जर तुम्हाला आवाजाचा एवढा त्रास होत असेल तर तुम्ही फोटोसाठी तिथे थांबू नका". तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "यांना खूप अॅटिट्युड आहे."


पाहा व्हिडीओ:






कधी रिलीज होणार 'द आर्चीज'?


'द आर्चीज' हा चित्रपट लोकप्रिय कॉमिक्स आर्चीजवर आधारित आहे. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत.   हा चित्रपट 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डान्स, मैत्री, रोमान्स आणि सर्व इमोशन्स दिसले. फ्रिडम, मैत्री,  प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व 'द आर्चीज' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन या भूमिकांची कथा दाखवण्यात येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


The Archies : शाहरुखचा लेक सुहाना खानला सपोर्ट! 'द आर्चीज'च्या प्रीमियरला किंग खान सहकुटुंब हजर; पाहा फोटो