Animal : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. चांगल्या आणि वाईट या दोन्ही कारणांनी हा सिनेमा चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमावर विरोध होत आहे. 


रणबीरच्या 'त्या' डायलॉगने नेटकऱ्यांचा राग अनावर


'अॅनिमल' या सिनेमातील काही सीन्स सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यातला एक सीन सॅनिटरी नॅपकीनवर आधारित आहे. रणबीर पत्नी रश्मिका मंदानाला ओरडताना दिसत आहे. रश्मिका दर महिन्याला पाळी आली की रणबीरकडे तक्रार करत असते. तर दुसरीकडे रणबीर अडल्ट डायपरचा वापर करत असतो. रणबीर आपल्या सर्जरीची तुलना रश्मिकाच्या मासिक पाळीसोबत करतो आणि म्हणतो,"महिन्याला चार वेळा पॅड वापरायला किती नाटक करते तू आणि मी रोज 50 करतो". 










रणबीरच्या या डायलॉगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. हे चार पॅड 11-59 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला पाच वेळा वापरावे लागतात. तू तुझ्या कुटुंबातील महिलांचा किती आदर करतोस हे आता कळलं? मासिक पाळीवर असं का बोललास? , अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


'अॅनिमल' या सिनेमातील अनेक डायलॉग आणि सीन्स वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. रणबीर-रश्मिकाच्या अनेक सीन्स आणि डायलॉग सेन्सॉरने हटवण्यास सांगितले होते. 'अॅनिमल' या सिनेमाची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. जगभरात हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे.


'अॅनिमल'चा जगभरात बोलबाला (Animal Box Office Collection)


अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 63.8 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी आणि पाचव्या दिवशी 38.25 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने 283.74 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 425 कोटींचा गल्ला जमवला आहे. 500 कोटींच्या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरू आहे.


संबंधित बातम्या


Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'पुढे कुणाचंच चालेना; पाच दिवसांत जगभरात केली 425 कोटींची कमाई