एक्स्प्लोर

बाळासाहेबांच्या धारदार आवाजासाठी 'या' कलाकाराची मागणी

आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांना वर्षभरापूर्वी 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा आवाज इतका हुबेहूब काढला, की डोळे मिटून ऐकणाऱ्यांना आपण खुद्द बाळासाहेबांनाच ऐकत असल्याचा अनुभव घेता आला.

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमातील संवाद दमदार असले तरीही बाळासाहेबांच्या आवाजाला जी धार होती, ती चित्रपटात ऐकायला मिळत नसल्याची नाराजी अनेक जण व्यक्त करत आहेत. कोणी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाचा पर्याय सुचवला, तर काहींनी डबिंग आर्टिस्टचा. पण एक अशी व्यक्ती आहे, जी बाळासाहेबांचा आवाज हुबेहूब काढते. आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांना वर्षभरापूर्वी 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा आवाज इतका हुबेहूब काढला, की डोळे मिटून ऐकणाऱ्यांना आपण खुद्द बाळासाहेबांनाच ऐकत असल्याचा अनुभव घेता आला. इतकंच काय, तर सोशल मीडियावरही चेतन सशीतल यांच्याच नावाची चर्चा आहे. व्हिडीओमध्ये बाळासाहेबांचा काढलेला हुबेहूब आवाज तुम्ही ऐकू शकता (वेळ 28.50 मिनिटांपासून पुढे). 'ठाकरे' चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदी चित्रपटात नवाजुद्दीनचाच आवाज ठेवण्यात आला असून मराठीसाठी अभिनेते सचिन खेडेकर यांचा आवाज वापरण्यात आला आहे. सचिन खेडेकरांचा आवाज लोकप्रिय असला तरी बाळासाहेबांच्या आवाजाशी साधर्म्य साधत नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यातूनच एक नाव समोर आलं, ते म्हणजे चेतन सशीतल यांचं. 'माझा कट्टया'वर बाळासाहेबांचा आवाज काढताना चेतन सशीतल यांनी एक किस्साही सांगितला होता. सशीतल जेव्हा बाळासाहेबांना भेटले होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना "माझा आवाज काढशील का?" असं विचारलं होतं. यावेळी त्यांनी बाळासाहेबांना त्यांचाच आवाज काढून चकित केलं होतं. ठाकरे चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन बाळासाहेबांची तर अमृता रावने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका निभावली आहे. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राऊत यांनीच पटकथा लिहिली असून अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 25 जानेवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Embed widget