एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेत्री श्री रेड्डीला घर सोडण्याची नोटीस
एमएएने श्री रेड्डीवर सामाजिक बहिष्कार घातला असून 900 सदस्यांना तिच्यासोबत काम न करण्याचे निर्देश दिले आहेत.
हैदराबाद : कास्टिंग काऊचचा निषेध म्हणून कपडे उतरवून निषेध नोंदवणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डीला घरं सोडावं लागणार आहे. आयएएस असलेल्या घरमालकाने तिला घर सोडण्यास सांगितलं आहे. हैदराबादच्या हुमायून नगरात श्री रेड्डी राहते.
श्री रेड्डीने फेसबुकवर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली. तिने लिहिलं आहे की, “माझ्या घरमालकाने मला कॉल केला आणि घर सोडण्यास सांगितलं. किती महान व्यक्ती आहे. तो आयएएस अधिकारी आहे. खरंच संकुचित वृत्तीचे लोक आहेत. माझ्याशी किती उद्धट बोलले याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. मोठ्या लोकांचा खेळ सुरु झाला आहे.
दरम्यान, मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (एमएए) श्री रेड्डीला सदस्यत्व नाकारलं. एमएएने श्री रेड्डीवर सामाजिक बहिष्कार घातला असून 900 सदस्यांना तिच्यासोबत काम न करण्याचे निर्देश दिले आहेत.
कास्टिंग काऊचविरुद्ध अभिनेत्रीचं भररस्त्यात टॉपलेस होऊन आंदोलन
काय आहे प्रकरण?
श्री रेड्डीने शनिवारी सकाळी भररस्त्यात कपडे उतरवून कास्टिंग काऊचचा निषेध केला. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला. तीन सिनेमांमध्ये काम करुनही आपल्याला एमएएचं सदस्यत्व मिळालं नाही, असंही ती म्हणाली.
दुसरीकडे श्री रेड्डीच्या निषेधानंतर दुसऱ्या दिवशी एमएएचे अध्यक्ष शिवाजी राजा यांनी तिच्या आरोपांना उत्तर दिलं. ही अभिनेत्री केवळ ड्रामा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती असं कृत्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याआधी एमएएने श्री रेड्डीचा सदस्यत्वाचा अर्जही फेटाळला होता. कोणी तिला पाठिंबा दिला, तर त्यांना एमएएमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असंही शिवाजी राजा यांनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement