Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेचा गोव्यात आजवरचा सर्वात हॉट अवतार, चाहत्यांचा रोष नको म्हणून कमेंटही ब्लॉक केल्या!


Prarthana Behere : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने छाप पाडली आहे. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून प्रार्थना घराघरांत पोहोचली. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्रार्थना बेहेरे सध्या कुटुंबातील महिलांसोबत गोव्याला फिरायला गेली आहे. गोव्यातील फोटो लगेचच अभिनेत्रीने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीच्या हॉटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे. विशेष म्हणजे चाहत्यांचा रोष नको म्हणून अभिनेत्रीने कमेंट्सदेखील ब्लॉक केल्या आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


जय भीम! आनंद शिंदेंच्या स्वरात किली पॉलचे सातासमुद्रापार महामानवाला अभिवादन!


Kili Paul : टांझानियाचा किली पॉल (Kili Paul) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. आजपर्यंत किलीने विविध मराठमोळ्या गाण्यांवरील रिल्स सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. आता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2024) किलीनं एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली 'कंबर कसून बांधणं असं रमाचं नांदणं' हे भीम गीत गाताना दिसत आहे. किलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आनंद शिंदेच्या स्वरात किली पॉलने सातासमुद्रापार महामानवाला अभिवादन केलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Aishwarya Rai Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; रोमँटिक अंदाजानं वेधलं लक्ष


Aishwarya Rai Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या-अभिषेकसंबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा हा व्हिडीओ अंबानींच्या (Mukesh Ambani) घरातला असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या-अभिषेकसह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) सध्या चर्चेत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Vidya Balan : इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही; नेपोटिज्मवर विद्या बालन स्पष्टचं म्हणाली


Vidya Balan : 'द इंडियन एक्सप्रेस'च्या (The Indian Express) 'एक्सुप्रेसो' या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात विद्या बालन (Vidya Balan) आणि प्रतीक गांधी (Pratik Gandhi) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आयुष्य, करिअर, स्ट्रगल आणि बॉक्स ऑफिससह विविध विषयांवर भाष्य केलं. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, असं म्हणत विद्या बाललने नेपोटिज्मवर व्यक्त झाली. विद्या बालन आणि प्रतीक गांधी सध्या त्यांच्या आगामी 'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त विद्या बालन आणि प्रतीक गांधी 'द इंडियन एक्सप्रेस एक्सप्रेसो' या कार्यक्रमात उपस्थित होते. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Arun Govil : राजकारणात आल्यानंतर अभिनयक्षेत्राला अलविदा? 'रामायण'मध्ये 'राम' साकारणारे अरुण गोविल म्हणाले..


Arun Govil : छोट्या पडद्यावरील 'रामायण' (Ramayana) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अरुण गोविल (Arun Govil) घराघरांत पोहोचले आहेत. श्रीमाच्या भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अरुण गोविल यांना प्रभू राम म्हणूनच पाहिलं जातं. अभिनयक्षेत्र गाजवल्यानंतर अरुण गोविल आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024) भाजपने (BJP) अरुण गोविल यांना उतरवलं आहे. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटात अरुण गोविल राजा दशरथच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसेल. राजकारणात एन्ट्री केल्यानंतर अरुण गोविल अभिनयक्षेत्राला अलविदा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा