Aishwarya Rai Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या-अभिषेकसंबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा चाहत्यांचा प्रयत्न आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकचा एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ऐश्वर्या-अभिषेकचा हा व्हिडीओ अंबानींच्या (Mukesh Ambani) घरातला असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या-अभिषेकसह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) सध्या चर्चेत आहेत. 


देशातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला. विविध क्षेत्रातील मंडळी या प्री-वेडिंगला उपस्थित होती. प्री-वेडिंगला बच्चन कुटुंबीयदेखील उपस्थित होतं. ऐश्वर्या-अभिषेकसह अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान आराध्या बच्चनच्या लूकची चांगलीच चर्चा झाली.


ऐश्वर्या-अभिषेकचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Aishwarya Rai Abhishek Bachchan Video)


मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) याच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या-अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या-अभिषेकने आपल्या धमाकेदार डान्स सादरीकरणाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. डान्स करताना दोघेही रोमँटिक झाले होते. दोघे बॉलिवूडचे पावर कपल आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. ऐश्वर्या-अभिषेकने प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) गाण्यावर डान्स केला होता. विश्वसुंदरीचा उत्साह पाहण्याजोगा होता. आता घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान त्यांचा रोमँटिक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


ऐश्वर्या-अभिषेकच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


ऐश्वर्या-अभिषेकच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या-अभिषेक एकेकाळी किती क्लोज होते, आता वहिनीचं वय झालं आहे, सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही होऊ शकतं, पतीसोबत डान्स करतेय त्यात चुकीचं काय? ऐश्वर्याला कोणीची चुकीचं ठरवू नये, ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट व्हायला नको, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय 2007 मध्ये लग्नबंधनात अडकली होती. अभिषेकसोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्याचं नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉयसोबत जोडलं गेलं होतं. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा तुटला होता.


ऐश्वर्या-अभिषेकचा रोमँटिक डान्स व्हिडीओ : 






संबंधित बातम्या


Aishwarya Rai : जया बच्चन ऐश्वर्या रायला म्हणाली 'नर्स'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सूनेचं केलं कौतुक