Hema Malini : बॉलिवूडमधील 'पावर कपल'च्या यादीत धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांचं नाव घेतलं जातं. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र या जोडीने एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रुपेरी पडद्यासह त्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली. हेमा मालिनी यांनी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून धर्मेंद्र यांची निवड केली असली तरी त्यांच्या आईला मात्र धर्मेंद्र जावई म्हणून नको होता. 80 च्या दशकात हेमा मालिनी यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. संजीव कुमार (Sanjeev Kumar) किंवा जितेंद्र (Jitendra) यांच्यासोबत हेमा मालिनी यांचं लग्न होणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत लग्नबंधनात अडकत हेमा मालिनी यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पण हेमा मालिनी यांच्या आईच्या मनात मात्र जावई म्हणून वेगळाच  अभिनेता होता. 


हेमा मालिनी यांना जावई म्हणून कोण हवा होता? (Hema Malini Mother Wish)


धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट 'तुम हसीन मैं जवान' होता. 1970 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानंतर 10 वर्षांनी हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटण्याआधी धर्मेंद्र यांचं लग्न झालं होतं. त्यांना चार मुलं होती. त्यामुळे हेमा मालिनी यांच्या आईला त्यांचं नातं मान्य नव्हतं. जितेंद्र हेमा मालिनीच्या आईला आवडायचा. मात्र धर्मेंद्र यांनी त्यांचं लग्न होऊ दिलं नाही. पुढे हेमा मालिनीचं नाव संजीव कुमार यांच्यासोबत जोडलं गेलं. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमासमोर कोणीही टिकलं नाही. 


डीएनएच्या रिपोर्टनुसार, एका जुन्या मुलाखतीत हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती म्हणाल्या होत्या की गिरीश करनड माझा जावई व्हावा, असं मला वाटत होतं. गिरीश करनड यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसह अनेक क्लासिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गिरीश त्याकाळचा हँडसम अभिनेता होता. अनेक बड्या अभिनेत्रींसोबत त्याने काम केलं होतं. गिरीश करनडने 'टायगर जिंदा है','एक था टायगर','उत्सव','स्वामी','निशांत','मंथन','भूमिका' आणि 'सूर संगम' सारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.


हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या चित्रपटांबद्दल जाणून घ्या (Hema Malini Dharmendra Movies)


धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी एकत्र शोले, सीता और गीता, ड्रीम गर्ल, अलीबाबा और 40 चोर, द बर्निंग ट्रेन, बगावत, पत्थर और पायल, सम्राट, राजा रानी, क्रोधी, शराफत, आस-पास सारख्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी 1980 मध्ये लग्नबंधनात अडकल्या. ईशा आणि अहाना देओल या त्यांच्या दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी त्याकाळी निर्मात्यांनी पहिली पसंती असत. दोघांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या आगामी  चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Hema Malini Dharmendra : धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्यासाठी एका कारणाने हेमा मालिनीचा सुद्धा होता विरोध!, म्हणाल्या,"ते चांगले होते, पण..."