Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Kota Factory Season 3 Trailer : "तैयारी ही जीत है"; 'कोटा फॅक्ट्री सीझन 3'चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी सुरू होणार जीतू भैयाचा क्लास
Kota Factory Season 3 : 'कोटा फॅक्ट्री' सीझन 3' (Kota Factory Season 3) या बहुप्रतीक्षित सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्स इंडियाने 'कोटा फॅक्ट्री सीझन 3'चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये जीतू भैया आयआयटी प्रवेश परिक्षेत विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास व्हावे यासाठी शिकवणी घेताना दिसून येत आहे. यंदा जीतू भैयासोबत तिलोत्तमा शोमदेखील विद्यार्थांना शिकवताना दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mirzapur Season 3 Release: अखेर प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर सीझन 3' ची रिलीज डेट जाहीर, मुन्ना भैय्याशिवाय असणार वेब सीरिज
Mirzapur Season 3 Release Date Announced : बहुप्रतिक्षीत आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलेली क्राईम-थ्रिलर वेब सीरिज 'मिर्झापूर सीझन 3' ची (Mirzapur Season 3) रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात (Mirzapur Season 3 Release Date Announced) आली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून अनेक कोडी टाकण्यात आली. चाहत्यांना रिलीज डेट ओळखण्याचा टास्क दिला असताना दुसरीकडे प्राईमने आज तारीखच जाहीर केली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
OTT Release This Week : वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं विचार करताय? वाचा 'या' आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज व सिनेमांची यादी
OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर तेच-तेच चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) पाहायचा कंटाळा आलाय. काहीतरी वेगळं, धमाकेदार पाहण्याची इच्छा असेल तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चांगले चित्रपट आणि वेबसीरिज उपलब्ध आहेत. प्रत्येक आठवड्यात अनेक जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. हे चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांना वीकेंडला आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसमवेत पाहता येतील. जाणून घ्या या आठवड्यात रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेबसीरिजबद्दल...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kalki 2898 AD Trailer : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज; आता प्रेक्षकांना फक्त चित्रपटाची प्रतीक्षा
Kalki 2898 AD Trailer Out : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2024 च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे. चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. आता ट्रेलर रिलीज झाल्याने चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'कल्कि 2898 एडी'च्या ट्रेलरमध्ये प्रभास, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), दिशा पाटनी (Disha Patni) या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Armaan Malik : अरमान मलिकचं हम तीन हमारे पाँच? आता कोणत्या बायकोच्या बेबी शॉवरची तयारी?
Youtuber Armaan Malik Wife Pregnant : युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरमान पुन्हा एकदा बाबा होण्यासाठी सज्ज आहे, असे म्हटले जात आहे. अरमानची पत्नी प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. पण अरमानची कोणती पत्नी पुन्हा प्रेग्नंट आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही. अरमान मलिकने एक नवा व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तो पत्नीसोबत बेबी शॉवर सेलिब्रेट करताना दिसून येत आहे.