Kota Factory Season 3 : 'कोटा फॅक्ट्री' सीझन 3' (Kota Factory Season 3) या बहुप्रतीक्षित सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नेटफ्लिक्स इंडियाने 'कोटा फॅक्ट्री सीझन 3'चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये जीतू भैया आयआयटी प्रवेश परिक्षेत विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास व्हावे यासाठी शिकवणी घेताना दिसून येत आहे. यंदा जीतू भैयासोबत तिलोत्तमा शोमदेखील विद्यार्थांना शिकवताना दिसणार आहे.
'कोटा फॅक्ट्री सीझन 3' पाहून प्रेक्षकांना अंदाज येईल की कोटामध्ये स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थांमध्ये तगडी स्पर्धा आहे. तसेच या स्पर्धापरिक्षांची तयारी करुन घेणाऱ्या संस्थांमध्येही मारामारी आहे. कोटामधील शिक्षण संस्था या एखाद्या फॅक्ट्रीप्रमाणे काम करतात. पण जीतू भैयाची शिकवण्याची आणि विद्यार्थांसोबत डील करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे त्याच्या शिकवणीवर प्रश्नही उपस्थित केले जातात.
जीतू भैया म्हणतो,"तैयारी ही जीत है"
ट्रेलरची सुरुवात जीतेंद्र कुमारच्या जीतू भैया या पात्रापासून होते. एका पॉडकास्टमध्ये तो म्हणताना दिसतो की,"यशस्वी निवडीसोबत आपल्याला यशस्वीरित्या प्रिपरेशनदेखील करायला हवं. जीत की तैयारी नहीं...तैयारी ही जीत है भाई". त्यानंतर होस्टदेखील अगदी बरोबर असे म्हणतो. तैयारी ही जीत है म्हटल्यानंतर जीतू भैया आपल्या विद्यार्थांची शिकवणी घेताना दिसून येतो. त्यानंतर बॅकग्राऊंडला आवाज येतो,"मित्रांनो हा आहे कोटा फॅक्ट्रीचा सर्वोत्कृष्ट शिक्षक जीतू भैया". पुढे जीतू भैया आपल्या विद्यार्थांना म्हणतो,"भावा हो किंवा नाही काहीतरी म्हण". त्यानंतर सर्व विद्यार्थी एकत्र म्हणतात,"हो भावा".
'कोटा फॅक्ट्री सीझन 3'बद्दल जाणून घ्या... (Kota Factory Season 3 Details)
'कोटा फॅक्ट्री सीझन 3' या सीरिजचं दिग्दर्शन प्रतीश मेहता यांनी केलं आहे. जितेंद्र कुमार, अहसास चन्ना, तिलोत्तमा शोम, रंजन राजसह अनेक कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'कोटा फॅक्ट्री'च्या पहिल्या सीझनचा प्रीमिअर 2019 मध्ये टीवीएफ प्ले आणि युट्यूब चॅनलवर झाला होता. त्यानंतर नेटफ्लिक्स इंडियाने 2021 मध्ये या सीरिजचा दुसरा भाग रिलीज केला. चाहते आता या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या