Mirzapur Season 3 Release Date Announced : बहुप्रतिक्षीत आणि चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलेली क्राईम-थ्रिलर वेब सीरिज  'मिर्झापूर सीझन 3' ची (Mirzapur Season 3) रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात  (Mirzapur Season 3 Release Date Announced) आली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून अनेक कोडी टाकण्यात आली. चाहत्यांना रिलीज डेट ओळखण्याचा टास्क दिला असताना दुसरीकडे प्राईमने आज तारीखच जाहीर केली. 


'मिर्झापूर सीझन 3' साठी व्हा तयार!


प्राईम व्हिडीओने कॅप्शन लिहित पोस्टर रिलीज केले आहे. 'कर दिए है प्रबंधन मिर्जापूर-3 का' अशी कॅप्शन पोस्टरसह देण्यात आली.  5 जुलैपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 







 
'मिर्झापूर सीझन 3' मध्ये  यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू मिळून मुन्ना भैय्याला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो.  या सीझनमध्येही मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू राहणार आहे. ही खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






चाहत्यांना येतेय मुन्ना भैय्याची आठवण


पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी मुन्ना भैय्याची आठवण येत आहे. मुन्ना भैय्या शिवाय ही वेब सीरिज अपूर्ण असल्याची प्रतिक्रिया एका युजरने व्यक्त केली आहे.  एकाने तर मुन्ना भैय्यासोबत 10 एपिसोड हवेत असे म्हटले. मुन्ना भैय्या शिवाय वेब सीरिज पाहायला मज्जा येणार नसल्याचे एकाने म्हटले. 



एक्सेल एंटरटेन्मेंटचे निर्माते रितेश सिधवानी यांनी म्हटले की, “मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचे कौतुक केले. आता पुन्हा एकदा प्रेक्षक मिर्झापूरमध्ये पोहचणार आहेत. प्रेक्षकांना हा सीझन आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.