Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Mukesh Ambani Nita Ambani : 'प्यार हुआ, इकरार हुआ'; रोमँटिक गाण्यावर थिरकले मुकेश अंबानी अन् नीता अंबानी; पाहा व्हिडीओ
Mukesh Ambani Nita Ambani Dance Video : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंददायी वातावरण आहे. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमातील मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Jhalak Dikhhla Jaa 11 Winner : फिनालेआधीच 'झलक दिखला जा 11'च्या विजेत्याचं नाव समोर; जाणून घ्या महाअंतिम सोहळ्यासंबंधित सर्वकाही
Jhalak Dikhla Ja 11 : 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhla Ja 11) हा डान्स रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आज 2 मार्च 2024 रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले आज जल्लोषात पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये मनीषा रानी, शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, अद्रिजा सिन्हा आणि धनश्री वर्मा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane : "प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून"; 'मुलगी झाली हो'चा उल्लेख करत किरण माने म्हणाले,"माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी…"
Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे ते वेगवेगळे प्रयत्न करत असतात. दरम्यान किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्री प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर यांचं कौतुक केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Eevlese Rop : सई परांजपे यांचे 'इवलेसे रोप’ रंगभूमीवर; मंगेश कदम आणि लीना भागवत मध्यवर्ती भूमिकेत
Eevlese Rop : ‘इवलेसे रोप’ (Eevlese Rop) छान डौलदार बहरावं यासाठी त्याला चांगलं खतपाणी घालावं लागतं. नात्याचंही तसंच असतं ते चांगलं बहरावं यासाठी प्रेमाचं आणि विश्वासाचं खतपाणी घालायचं असतं. मुरलेल्या नात्याची अशीच खुमासदार गोष्ट घेऊन लेखिका दिग्दर्शिका सई परांजपे (Sai Paranjpye) 13 वर्षांनी रंगभूमीवर आल्या आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mukesh Ambani : "अनंतमध्ये मी माझे वडील धीरूभाई अंबानी यांना पाहतो"; लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये मुकेश अंबानी भावूक
Mukesh Ambani on Anant Ambani : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच राधिका मर्चेंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये सध्या अनंत-राधिका यांचं प्री-वेडिंग पार पडत आहे. दरम्यान प्री-वेडिंग कार्यक्रमात पाहुण्यांसोबत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की,"मी जेव्हा अनंतला पाहतो तेव्हा मला त्याच्यात माझे वडील धीरूभाई (Dhirubhai Ambani)दिसतात".