Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kiran Mane : अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश; हाती शिवबंधन बांधत म्हणाले," शिवसेना सर्वसामान्यांची आहे"


Kiran Mane Join Shiv Sena Uddhav Thackeray : राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv sena Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा होती. अखेर शिवबंधन बांधत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Tiger 3 OTT Release : सलमानचा 'टायगर 3' ओटीटीवर रिलीज! 


Tiger 3 OTT Release : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भाईजानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने निराशाजनक कामगिरी केली. पण आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bigg Boss 17 : 'बिग बॉस'मध्ये पुन्हा धमाका करण्यासाठी भारती सिंह सज्ज


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता विनोदवीर भारती सिंह (Bharti Singh) पुन्हा एकदा 'बिग बॉस 17'मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jui Gadkari : नव्या वर्षातही छोट्या पडद्यावर सायलीचं राज्य! जुई गडकरी म्हणते,"प्रेक्षकांच्या प्रेमामुळे जबाबदारी आणखी वाढतेय"


Jui Gadkari on Tharla Tar Mag : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serials) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेने 2023 गाजवलं असून आता 2024 गाजवायला ती सज्ज आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Ajay Devgn : ना खाली हाथ आये थे, ना खाली हात जाएंगे; आणखी एक केस सोडवण्यास अमय पटनायक सज्ज


Ajay Devgn Raid 2 Shooting Start : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत अजयने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा