Jui Gadkari on Tharla Tar Mag : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serials) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेने 2023 गाजवलं असून आता 2024 गाजवायला ती सज्ज आहे. 


जुई गडकरीची 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या (TRP) शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. याबद्दल एबीपी माझासोबत बोलताना जुई गडकरी म्हणाली,"आपली मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे याचा नक्कीच आनंद आहे. मालिकेची संपूर्ण टीम खूप मेहनत करत असून या मेहनतीचं फळ मिळत आहे".






जुई गडकरी पुढे म्हणाली,"मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम पाहून जबाबदारी आणखी वाढते. टीआरपीतला क्रमांक टिकवण्यासाठी आणखी मेहनत घेत आहोत. प्रेक्षक न चुकता मालिका पाहत असल्याने आम्ही टीआरपी रिपोर्टमध्ये न चुकता पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे प्रेक्षकांचे खूप-खूप आभार. टीआरपीत पहिल्या क्रमांकावर असण्यासोबत रेटिंगदेखील वाढत आहे". 


सायलीने जुई गडकरीला काय दिलं?


जुई गडकरी पुढे म्हणाली,"देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. ज्यासाठी एवढे वर्षे थांबले त्याची सुरुवात आता झाली आहे. त्यामुळे 'ठरलं तर मग'च्या माध्यमातून माझं कमबॅक यशस्वी झालं आहे. सायली कधीच कोणत्या गोष्टीसाठी रडत बसत नाही. सायली नेहमीच हसतमुख असते. सायलीच्या चेहऱ्यावर कायमच हसू असतं. त्यामुळे मीदेखील सायलीसारखं राहावं, असंच मला कायम वाटतं". 


जुई गडकरीचे 2024 चे संकल्प काय आहेत? 


जुई गडकरी 2024 च्या संकल्पाबद्दल बोलताना म्हणाली,"आणखी चांगल्या-चांगल्या कलाकृती करण्याची इच्छा आहे. डोके शांत ठेऊन प्रत्येक गोष्ट करण्याचा माझं प्रयत्न असेल. तसेच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणार आहे". 


'TRP'च्या शर्यतीतील 'टॉप 5' मालिकांबद्दल जाणून घ्या... (TOP 5 Marathi Serials)


1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 7.1 रेटिंग मिळाले आहे.


2. तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.


3. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Paulanni) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे.


5. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका चौथ्या क्रमांकावर असून या मालिकेला 4.3 रेटिंग मिळाले आहे.


संबंधित बातम्या


Marathi Serials : जुई गडकरीने वर्षाची सुरुवात केली दणक्यात; टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर