Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Deepika Padukone Dance : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा धमाकेदार डान्स; शाहरुखने दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा


Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Deepika Padukone Dance : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. या प्री-वेडिंगला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला प्रेग्नंट असलेल्या दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) धमाकेदार डान्स केला आहे. तर दुसरीकडे शाहरुखने (Shah Rukh Khan) 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jhalak Dikhhla Jaa 11 Winner : मनीषा रानी ठरली 'झलक दिखला जा 11'ची विजेती! 


Jhalak Dikhla Jaa 11 Winner : 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhla Jaa 11) या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. गेले काही महिने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. बिहारची मनीषा रानी (Manisha Rani) या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Dattu More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत मिळालं घर; चाळीतून थेट जाणार आलिशान फ्लॅटमध्ये


Dattu More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery) घर मिळालं आहे. विनोदवीर आता चाळीतून थेट आलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. दत्तूला एक नव्हे तर दोन घरे लागली आहेत. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने घरंदाज झाला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kishori Ambiye : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेत किशोरी अंबियेची एन्ट्री; आज रंगणार महाएपिसोड


Kishori Ambiye : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Priteechi Ajab Kahani) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत आता विनोदी अभिनेत्री किशोरी अंबियेची (Kishori Ambiye) एन्ट्री झाली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serials : टीआरपी शर्यतीत 'ठरलं तर मग'चं अधिराज्य कायम, 'या' मालिकांच्या TRP मध्ये झाली घसरण


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा