Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Deepika Padukone Dance : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. या प्री-वेडिंगला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला प्रेग्नंट असलेल्या दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) धमाकेदार डान्स केला आहे. तर दुसरीकडे शाहरुखने (Shah Rukh Khan) 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. 


बी-टाऊनमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) समावेश आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला हजेरी लावण्याआधी दीपिकाने प्रेग्नंसीची घोषणा केली होती. 


दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या सहा वर्षांनी आई-बाबा होणार आहेत. BAFTA पुरस्कार सोहळ्यानंतर दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर जोडप्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 


अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये थिरकली दीपिका पादुकोण


'मॉम टू बी' दीपिका पादुकोण सध्या आपला पती रणवीर सिंहसोबत राधिका मर्चेंट  आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये आहे. पहिल्या दिवशी अभिनेत्री रिहानाची कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसून आली. दुसऱ्या दिवशी दीपिकाने रणवीर सिंहसोबत 'दिल धडकने दो' या सिनेमातील 'गल्लां गूडिया' गाण्यावर धमाकेदार डान्स केला. प्रेग्नंट दीपिकाने आपल्या नृत्याने उपस्थित असलेल्या मंडळींची मने जिंकली. सोशल मीडियावर दीपिका-रणवीरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.






दीपिका-रणवीरच्या लूकने वेधलं लक्ष


अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये दीपिका-रणवीरच्या रॉयल लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दीपिकाने सोनेरी रंगाचा लेहेंगा परिान केला होता. तर रणवीरने काळ्या रंगाचा खास आऊटफिट परिधान केला होता. 


शाहरुखने दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा (Shah Rukh Khan Video Viral)


अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमधील बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये किंग खान होस्टिंग करताना दिसत आहे. मंचावर येताच सर्वात आधी त्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या आहेत. त्याच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.






संबंधित बातम्या


Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूडकर थिरकले; तिन्ही खानचा एकत्र डान्स पाहिलात का?