Jau Bai Gavat Winner Ramsha Farooqui : 'झी मराठी' वाहिनीवरील (Zee Marathi) 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वात रमशा फारुकीने बाजी मारली. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत रमशा  फारुकी (Jau Bai Gavat Winner Ramsha Farooqui ) ही पहिल्या पर्वाची विजेती ठरली. तर, अंकिता मेस्त्री ही उपविजेती ठरली. प्रत्यक्षात गावात राहुन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. अखेर अंतिम फेरीत पाच स्पर्धक राहिल्या. त्यानंतर अखेरच्या तीन स्पर्धकांमध्ये रमशा बाजी मारली. 


‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा, रविवारी 11 फेब्रुवारी रोजी पार पडला. या महाअंतिम फेरीसाठी महेश मांजरेकर, आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या उपस्थितीत 'जाऊ बाई गावात'ची महाअंतिम फेरी रंगली. 4 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या रिएलिटी शोला तीन महिन्यांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर आपली पहिली विजेती मिळाली.  प्रत्यक्ष गावात जाऊन तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधणे, त्यांच्यासोबत ग्रामीण भागातील जीवन जगणे, शेती करणे अशा टास्कसह इतरही आव्हानात्मक टास्क या रिएलिटी शोमध्ये होते. 


टॉप तीन स्पर्धक कोण?


रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीत जागा  मिळवली होती. या पाचही स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा दिसून आली.श्रेजा आणि रसिक या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये स्थान मिळवू  शकल्या नाहीत. तर अंतिम फेरीत रमशा, संस्कृती आणि अंकिता  यांच्यात विजेत्या पदासाठी चुरस दिसून आली.  संस्कृती ही तिसऱ्या स्थानी राहिली.  तर, रमशा  फारुकीची विजेती  म्हणून घोषणा होताच एकच जल्लोष उपस्थितांनी केला.  विजेत्या रमशाला 20 लाख रुपयांचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली. यावेळी पुढील पर्वाची घोषणा करण्यात आली.






रमशाने काय म्हटले?


गेले दोन महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरीने इससे मुझे मिलाने की साज़िश की है” खरंच माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता